अखेर निर्भयाच्या दोषींना एकाच वेळी चौघांना फाशी!

नवी दिल्ली: निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला. आज पहाटे साडेपाच वाजता चारही दोषींना एकच वेळी फासावर लटकवलं गेलं. फाशी पूर्वीचा अर्धा तास अतिशय महत्त्वाचा ठरला. या दरम्यान दोषींनी स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. ते ढसाढसा रडले, फाशी घरात लोटांगण घातले. पण अखेर न्याय झाला ज्याची सर्वांना प्रतिक्षा होती. चौघांना एकाच वेळी फाशी - चारही दोषींना एकाच वेळी फाशी दिली गेली. तिहार तुरुंगातील क्रमांक ३ मधील फाशी घरात चौघांना फाशी देली गेली. यासाठी पवन जल्लाद यांनी ही फाशी दिली. यासाठी त्याला ६० हजार रुपये दिले गेले. पहाटे ३.१५ ला झोपेतून उठवलं गेलं पहाटे ३.१५ वाजता चारही दोषींना उठवण्यात आले. पण चौघांपैकी एकही झोपलेला नव्हता. प्रातः विधी पूर्ण केल्यानंतर त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. त्यांच्यासाठी चहा मागण्यात आली. पण कुणीही चहा प्यायला नाही. मग त्यांना शेवटची इच्छा विचारली गेली. कोठडीतून बाहेर काढण्यापूर्वी त्यांना काळा-कुडता पायजमा घातला गेला. चौघांचे हात मागच्या बाजूला बांधले गेले. यावेळी दोघांनी हात बांधण्यास नकार दिला. पण त्यांचं ऐकण्यात आलं नाही.विनय रडला, कपडे बदलले नाही फाशी देण्यापूर्वी दोषींना आंघोळ करून कपडे बदलण्यास सांगितलं गेलं. त्यावेळी विनयने कपडे बदलण्यास नकार दिला. तो रडू लागला आणि माफीही मागू लागला. निर्भयाच्या दोषींना फाशी दिली; अखेर ७ वर्षांनी मिळाला न्याय बेटा तुला न्याय मिळाला, निर्भयाची आई भावुक फाशी घरात एक दोषी उशिरा गेला फाशी घरात दोषींना नेण्यात येत होतं. यावेळी दोषींपैकी एक जण घाबरला. फाशी घरातच त्याने लोटांगण घातलं आणि पुढे जाण्यास नकार दिला. मोठ्या प्रयत्नांनी त्याला पुढे नेलं गेलं. यानंतर त्यांचे चेहरे काळ्या कापडाने झाकण्यात आले. फाशीच्या तख्तावर लटकवण्यापूर्वी त्यांच्या गळ्यात दोर बांधण्यात आला. फाशी वेळी हालू नये म्हणून तिथे त्यांचे दोन्ही पायही बांधण्यात आले. यानंतर तुरुंग क्रमांक ३च्या अधीक्षकांनी मंजुरी दिल्यावर पवन जल्लादने त्यांना फाशी दिली. यानंतर ६ वाजता चारही दोषींची तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले.


Popular posts